वेदना वाचुन घेत जा
वेदना वाचुन घेत जा
सुखात हसणं सोपं असतं हो ,
कधीतरी दुःखातही हसुन घेत जा ..
वेद वाचन सोपं असतं हो दादा,
कुणाच्या वेदना वाचुन घेत जा ..
क्षणभंगुर हा नरदेह आपला
प्रत्येक क्षण हर्षात जगुन घेत जा ...
वेद वाचन सोपं असतं हो ,
कुणाच्या वेदना वाचुन घेत जा ..
श्रीमंतांचे सखे सगळेच असतात हो ,
कधी गरीबाच्या लेकालाही कुरवाळत जा ..
वेद वाचन सोपं असतं हो ,
कुणाच्या वेदना वाचुन घेत जा ..
या विश्वात सगळेच आनंद नसतात हो
कधी कुणाचे दुःखही जाणून घेत जा ...
वेद वाचन सोपं असतं हो ,
कुणाच्या वेदना वाचुन घेत जा ..
कुणी असेल जर संकटाच्या विळख्यात
त्याला तुम्ही मदतीचा हात देत जा ,
वेद वाचन सोपं असतं हो ,
कुणाच्या वेदना वाचुन घेत जा ..
कुणाच्या विश्वासाची भिंत ढासळली असेल
तल आपलेपणाने ती तुम्ही रचून देत जा ...
वेद वाचन सोपं असतं हो ,
कुणाच्या वेदना वाचुन घेत जा ...
कुणी असेल आनंदाचे क्षण मोजत ,
तुम्हीही त्या आनंदात सामील होत जा..
वेद वाचन सोपं असतं हो ,
कुणाच्या वेदना वाचुन घेत जा ..
पापाचा घडा हा रिता करून ,
पुण्याचा घडा अहो भरून घेत जा ...
वेद वाचन सोपं असतं हो ,
कुणाच्या वेदना वाचुन घेत जा ..
किती दिवसाचे पाहुणे नसे ठाऊक हे
बोल प्रेमरसाचे सर्वथा बोलुन घेत जा ..
वेद वाचन सोपं असतं हो ,
कुणाच्या वेदना वाचुन घेत जा ..
सोडा सारे राग ,द्वेष मनातले
दुखरे क्षण हे विसरून जात जा
वेद वाचन सोपं असतं हो माऊली,
कुणाच्या वेदना वाचुन घेत जा ..
परमेश्वर चराचरात सामावलायं
माणसातील देवही पुजून येत जा
वेद वाचन सोपं असतं हो दादा
कुणाच्या वेदना वाचुन घेत जा