वेदना मनातील
वेदना मनातील
वेदना मनातील ती च्या
कुठे कोणा कळतात
तिला न्याय मिळावा म्हणून
किती मेणबत्या वितळतात
वासनाधीन नराधमाच्या
जाळ्यात ती अडकते
वर्षनुवर्षं न्यायालयात
वेदनांनी तडफडते
न्याय मिळणे तर दूरच
तिच्यातच शोधतात उणीव
तिच्या दुःखाची इथे
आहे का कोणाला जाणीव
आई ,बहीण ,मुलगी, सून बनून
ती त्यागाची मिर्ती ठरते
पण तिचेच अस्तित्व
तिच्यासाठी सांगा कुठे उरते
किती भोगला वनवास तरी
अग्निपरीक्षा तिनेच द्यावी
तिच्या अत्याचारासाठी तिने
सांगा कुठे दाद मागावी
युगे युगे सरली तरी
कायम ती उपेक्षित
५०% आरक्षण असून सुद्धा
ती आजही आहे कुठे सुरक्षित
