वेडा मी
वेडा मी
1 min
12.2K
काढले वेड्यात मला
होती ती लोक शहाणी
आज अचंबित झाली
ती ऐकून माझी कहाणी
उपेक्षा, चेष्टा पण
घेतल्या मी पदरात
कुणाला माहित काय
बीज नियतीच्या उदरात
जरी टोचले काटे पण
नाहि सोडली ती वाट
सोसली उन्हाची सळ
थोपावली समुद्राची लाट
मी शांत, ती लोक
होते नेहमी बोलत
एकाच रस्त्यावरुन
सारेजण इथं चालत
पाहिले तारे कितीदा
नाही झाला अर्थबोध
एक वेडा मी, चालू होता
फक्त माझाच शोध
