वडील
वडील
1 min
232
जन्मताच आपल्याला ज्यांची
ओळख मिळते,
नाव ठेवलेले असो वा नसो
काही दिवस वडिलांच्याच नावाने ओळखले जाते...||१||
सगळ्यांच्याच आयुष्यात
वडिलांचे असते एक खास नाते,
सावलीखाली राहतो त्यांच्या
असतात ते आपले जन्मदाते...||२||
मोठ्या संकटात
त्यांच्या नुसत्या 'बापरे' नावानेच भय जाते,
सुखरूपासाठी आपल्या तेही
अलगद डोळे मिटते...||३||
दाखवत नाहीत ते कधी
क्रोध,प्रेम,माया नुसते,
वरून असले फणस जरी
आतून मऊ गाभ्यासारखे असते...||४||
मुलींसाठी ते 'राजा'
तर मुलांसाठी 'कवच' असते,
कोणी असो वा नसो
'वडील' मात्र आपले 'सुरक्षयंत्र* असते...||५||
