वडापाव
वडापाव
1 min
487
खाऊ गल्लीची शौकीन मी
चाखते प्रत्येक पदार्थ
लाड जीभेचे पूरवते
हीच खरी खाण्याची शर्थ
वडापाव मज प्रिय
तेलकट असला जरी
वाढले कितीही वजन
थांबवले नाही खाने तरी
रुचकर,चविष्ट भारी
सोबत तिखट मिरची
चटणी लाल चटकदार
भूक भागवते आमची
पदार्थ हा न्याहारिचा
मनसोक्त खाते जेवणंम्हणुन
खाल्ला जरिये वारंवार
खमंगपणा असतो सदा नवीन
गरीबाला परवडणारा
बर्गर असतो तो
किमान पैशात त्यांची
रात्र भागवून नेतो तो
