STORYMIRROR

Umesh Dhaske

Others

3  

Umesh Dhaske

Others

वडापाव

वडापाव

1 min
164

खमंग वडापावाचा दरवळ

एखाद्या सुवासिक फुलासारखा चौफेर दरवळत होता..

येता जाता जो तो क्षणभर तिथेच थांबत होता....!


तोंडून सुटणारी लाळ कुठेतरी लपली जात होती.

खमंग वड्याची लज्जत आणखीनचं वाढत होती....!


डाळीच्या पिठात लसणाची घाई..

कोथंबीर ,मिरची तोर्‍यात येई बाई....

आलं,हळद,मीठ लाडूकलीचं 

असतात...

सगळे त्या पीठात मनसोक्त उडया घेतात...


एकजीव झाले की बटाटेरावांच्या स्वाधीन होतात..

तिखटाने माखलेले बटाटेराव

पीठात उडी घेतात...!


बुडलेले बटाटेराव उकळत्या तेलातच मारतात बुडी

तोपर्यंत आपली मात्र तोंडावर बोट आणि हाताची घडी....!


खमंग दरवळीनं वडा आपला सजला...

इकडे तिकडे पाहून 

हळूच पावात जाऊन बसला!


तळकी मिरची,पुदीना चटणी

सांगा आता कुणाकुणाला हवी बरं वाटणी ?


आई ,बाबा,काका,काकी

अण्णा,तात्या वहिनीबाई

दादा,मामा,सोबत मामी

छकुली संगे सोनुली बाळी,


छोट्या मोठ्यांचा

सार्‍यांचा लाडका 

लाडका वडापाव

आवडीच्या आमचा...


Rate this content
Log in