वडा...!
वडा...!
1 min
196
वडा पाव म्हंटल
की तोंडाला पाणी सुटत
घड्याळाच भान
पण पुरत मरत
सकाळ असो की दुपार असो
संध्याकाळ असो की रात्र असो
वेळेला महत्व पसार होत जेंव्हा
वडा पावाच्या टपरीवर मन धाव घेत
नाष्टा भोजन वेळ मारू आहार
कुठेही याचा असतो विहार
चवीला मिरचीचा आधार
कोणीच घेत नाही माघार
तृप्तता जिभेची सहज होते
तलफ जीवाची क्षणात भागते
अब्रूची पण लाज राखली जाते
खिश्याला परवडणारी मौज होते
अप्रूप मोठे मोठ्यांना त्यात दिसते
गरिबांना ही त्याचे नवल वाटते
वड्याला पाहून डोळ्याचे पारणे फिटते
वेळेला वड्याचे महत्व कळते....!
