वचन
वचन
भेदरलेल्या मनाला
दिलासा देत
आज वचन देते
वासनांध या मनुष्यप्राण्याला
मी घाबरणार नाही.......
निसटले असतील काही
क्षण माझे ध्येयप्रवासाचे
वचन माझे आज स्वतःला
जग हार म्हटले
तरी मी स्वतःला हारु देणार नाही....
जो तो वंदन
करी उगवत्या
पाठ फिरवी मावळत्या
असे असले तरी
वचन देते मी माझ्या आसवांना
त्यांना सारखं वाहायची संधी देणार नाही.....
बदलास या सामोरे मी जाईन
नवउमेदीचा हा प्रवास धैर्याने पार करीन
वचन आज माझे मलाच
आयुष्याच्या शर्यतीत
एक स्त्री म्हणून अव्वल राहायचा मी प्रयत्न करीन...
