वायूप्रदूषण
वायूप्रदूषण
काय पण ते दिवस होते,
हिरवळ होती चोहीकडे,
सुजलाम सुफलाम सृष्टी सारी,
आरोग्यदायी जीवन सगळीकडे.
झाली औद्योगिक क्रांती,
सुधारले जनजीवन,
समस्याही वाढल्या खूपच,
विस्कळीत झाले वातावरण.
औद्योगिकीकरणाचे वाढले वारे,
जिकडे तिकडे कारखाने सारे.
औद्योगिकीकरणासाठी झाली जंगलतोड,
निरोगी जीवनाचा झाला बीमोड,
कारखान्याचा धूर पसरला वातावरणात,
वायूप्रदूषणाची झाली वाढ क्षणाक्षणात.
इंधनावर चालणाऱ्या वाहनांनी,
झाले सुखकर साऱ्यांचे जीवन,
पण अतिवापरामुळे यांच्या,
हवेचे मात्र वाढले प्रदूषण.
जडले श्वसनाचे विकार,
वाढले फुफ्फुसांचे आजार,
घ्यावी लागली पर्यावरणापुढे हार,
सजीवस्रुष्टीचे जीवन झाले बेजार.
धूर ओकणारे कारखाने,
दूषित वायू सोडणारी वाहणे,
घालूया आपणच आपल्याला ,
थोडीफार का होईना बंधने.
वेळ अजून गेली नाही,
सारेजण सावध व्हा रे,
झाडे लावा, झाडे जगवा,
हा मंत्र जपूया आपण सारे.
करू या वातावरणाचे शुध्दीकरण,
जगू या छान असे निरोगी जीवन
