वायू प्रदूषण
वायू प्रदूषण
लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे
औद्योगिक विकास होऊन कारखाने वाढले
लोकांच्या सोयी व कारखान्यांच्या जागेसाठी
कारखानदारांनी अमर्याद वृक्ष तोडले
लोक खुश झाली ती रोजगार मिळेल
पण काम करून शरीराची कंबरडे मोडले
कचरा प्लास्टिक टायर लाकडं यांचा
इंधन जाण्यासाठी वापर वाढले
मालवाहक वाहनं वाढून त्याच्यातही
पेट्रोल डिझेल चे वापर वाढले
या सर्वांच्या जडण प्रक्रियेमुळे
वातावरणात प्रदूषण वाढले
अनुबॉम्बसारखे शास्त्रीय प्रयोगाने
वायूप्रदूषण भरपूर वाढले
आरोग्य समस्या श्वासात त्रास
अनेक प्रकारचे रोग वाढले
या प्रदूषणामुळे मोठ्या शहरात
अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले
वनस्पतीची पाने वाढून वाढ खुंटली
उत्पन्न कमी होऊन झाडे सुकू लागले
प्रदूषणामुळे ऐतिहासिक वास्तूंचे ही
नुकसान होऊन रंग बदलले
हवामानावर व पावसावरही
परिणाम होऊन तापमान वाढले
