STORYMIRROR

Dinesh Kamble

Others

3  

Dinesh Kamble

Others

वावटळ

वावटळ

1 min
279

कधीकधी ध्यानीमनी नसताना एकेक करत 

जमायला लागतात असंख्य विचार मनःपटलावर  

आणि मग तेच विचार धारण करतात

एक विघातक, विध्वंसक अशा वावटळीचे रूप 


आणि गांगरून जातोय माणसाचा जीव.

ससेहोलपट होते माणसाची या विचारांचा 

अचानकपणे मनावर होणार मारा सोसतांना 

आणि मग तो उधळून देतो मनातल्या साऱ्या इच्छा  

त्या वावटळीच्या हरेक घुमाऱ्यासोबत


अशा विध्वंसक समयी त्याला हवा असतो 

एक आशेचा किरण तो शोधात असतो 

कुण्यातरी आपल्या माणसाच्या 

जो पुढे येईल आणि काढेल त्याला

या कालचक्राच्या भेदातून बाहेर 


तेव्हा तू धावून जा आणि 

त्या भित्र्या काळजावर उमेदीची लेप लावायला पुढाकार घे

त्या वावटळीच्या विनाशकारी, बिभस्त तांडवातून 

मोकळा कर त्या पीड़ित आत्म्याला 

एका जीवाला, त्या माणसाला.


Rate this content
Log in