वाटतय काही लिहाव तुझ्यावर...
वाटतय काही लिहाव तुझ्यावर...
वेड्या मनाला आज काही, सुचत नव्हतं कशावर
भरकटला होता श्वास, माझ चित्त नव्हत थार्यावर
अंधारलेल भविष्य, कालचक्राच्या वाऱ्यावर
म्हणून आज वाटलं पुन्हा, काहीतरी लिहावं तुझ्यावर...
आठवणींचा साकव, आपल्या जीवनातला तुटला
सांभाळताना स्वतःला, तोल माझा सुटला
नकाराच्या वीजा तुझ्या, कोसळल्या माझ्या काळजावर
म्हणून आज वाटलं पुन्हा, काहीतरी लिहावं तुझ्यावर...
इतकं सोपं नसतं, कोणासाठी कागदांवर लिहिणं
खूप कठीण असतं, विरहात रडण तरीपण तिच्यासाठीच झुरणं
माझ्या एकटेपणाचं ग्रहण सोडवणं, आता आहे तुझ्यावर
म्हणून आज वाटलं पुन्हा, काहीतरी लिहावं तुझ्यावर...
ठरवलं होतं आता काहीच, नाही लिहायच तुझ्यावर
विरघळलेले भाव पुन्हा, नाही गोठवायचे बर्फावर
ये ना पुन्हा माझ्या आयुष्यात, आवडेल तुला जर
म्हणून आज वाटलं पुन्हा, काहीतरी लिहावं तुझ्यावर...