वाटते मला...!
वाटते मला...!
वाटतें मला....!
वाटते मला
चार चौघांसारखे
साधे सोपे जीवन असावे
बंध पाश
बाजूस सारून
थोडे आता मुक्त जगावे...
आपल्या
जगण्यावर
कोणते कोणाचे
आरोप पित्यारोप नसावे
वाटते मग
एवढे कोणते भाग्य आपले..
आपण आपले
चार चौघांसारखे
थोडे
मन मिळावू
थोडे अलिप्त
कसे लाभेल मग
सौभाग्य सुरेख...?
पण
एक दिवस
असाही उगवतो
स्वप्न माझे साकार करतो
कधीतरी काहीतरी
अचानक
तो शक्कल लढवतो
आणि
एकट्यालाच बाजूला सारून
सर्वांना
कारणपरत्वे
मज पासून दूर करतो
तेंव्हा मात्र
मला खूप हेवा वाटतो
त्यांच्या बरोबर मी ही जातो
शरीराला अलिप्ततेचा धर्म कळतो
पण मनाला मात्र संगे ठेऊन
तो अंतरात उभा जाळतो...
स्वातंत्र्य पुन्हा
पारतंत्र्यातच जाणवते
सगे सोयरे आप्त जनात जेंव्हा
पुन्हा पुन्हा मन रमते
अशी अवस्था जीवनाची
गोडी जगण्याची वाढवते
वाटले जरी मुक्त व्हावे
तरी हे जीवन माझे
पुन्हा पुन्हा
मला जखडून ठेवते
आहे तिथेच
आहे तसेच
निवांत रहा म्हणते
तेंव्हा खरे
जीवन कळते
तेंव्हा खरे जीवन कळते...!
