STORYMIRROR

Anita Bodke

Others

2  

Anita Bodke

Others

वाटते दोघात जर.....

वाटते दोघात जर.....

1 min
221

वाटते दोघात जर तुलना करावी कर तुला!

मात्र नाही यायची त्याच्या नखाची सर तुला!


जन्मभर वेड्यापरी मी घातल्या हाका तुला

पण कधी फुटलाच नाही शेवटी पाझर तुला!


एकदा आलो जवळ मिटवून सारी अंतरे

मग पुढे जमलेच नाही द्यायला अंतर तुला!


पिंजरा तोडून आता झेप घे तू पाखरा

घालते आहे कधीची साद हे अंबर तुला!


जप तुझा, पूजा तुझी चाले मनाच्या मंदिरी

मानते मी देव माझा मानते ईश्वर तुला!


जाणते करशील माझी चूक देवा माफ तू

बोलते आहे जरी रागात मी पत्थर तुला!


थांबना गोळा करू दे एवढ्या काचा मला

काय झाले आरशाचे सांगते नंतर तुला!


साहित्याला गुण द्या
लॉग इन