वात्सल्य..
वात्सल्य..
1 min
11.8K
वात्सल्याची वत्सल मूठ
बाकी सगळे केवळ झुठ
प्रेमाचा या दौलतीमध्ये
व्हायची नाही कधीच तूट
मोद पाझरे इथे ममतेचा
निर्झर खळाळता मायेचा
स्पर्शाची ही किमया सारी
जिव्हाळा दूध सायीचा.
जीव जीवातूनि घे आकार
प्रेममुर्ती मग होई साकार
स्वर्ग याहूनि काय वेगळा
हवा कशाला साक्षात्कार..?