वास्तवता
वास्तवता
*वास्तवता*
कुटुंबात सर्वच ठिकाणी
वरवर सारे काही चांगले दिसते
मात्र खरे खोल गेलात तर
वास्तवता खूप वेगळी असते...
कधीतरी वाद पण होतात
नेहमी छान सुसंवाद घडतात
असेच असायला हवे खरे तर
तरच सारी नाती टिकून राहतात..
सारे जण एकमेकांची काळजी घेतात एकमेकांना टाकून पण बोलतात
पण प्रेम हेच जिंकते खरे तर
एकमेकांना संकटकाळी धीरही देतात...
मत जपण्याचा प्रयत्न करतात
हालाखीच्या दिवसात साथ देतात
सणावाराला एकत्र येऊन
सर्व मौजमजा देखील करतात...
हा संसार, कुटुंब आहे आपलेच
चांगलेच ऐकावे, चांगलेच पहावे
सर्वांना आधार द्यावा आणि
सर्वांच्या हिताचे तेवढेच करावे...
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा- पुणे*
*मो. नं.9822582116*
सुंदर सकाळच्या सर्वांना मनभावन शुभेच्छा! ❤️🙏🌹
