वास्तूशांती शुभेच्छा
वास्तूशांती शुभेच्छा
छोट्यातून मोठे झाले घर
सर्व सुखाचा नवा बहर
घराच्या असू दे रंगीत भिंती
जपून ठेवा नातीगोती
नाकी नऊ येतात फेडता फेडता लोन
तेव्हां आपल्याकडं बघत नसते कोण
आपण मात्र बघायचं प्रेमाने
लवकर फेडायचा हप्ता नेमाने
चुटकी सरशी फिटून जाईल लोन
आतुरतेने वाट बघायची आपल्याकडं येणार कोण
क्षणभर पहुडायचे
सुंदर स्वप्न बघायचे प्रत्येक रात्री
भरभराट होणार ही निश्चित खात्री
आप्तेष्टांना बोलवत रहा, राखा त्यांचा मान
उत्कर्षाचे लिहीले जाईल रोज नवे पान
