वाऱ्याची एक झुळूक
वाऱ्याची एक झुळूक
1 min
208
एक वार्याची झुळूक व्हावे
आईच्या मिठीत रमून जावे
बाबांशी हितगुज करूनी
अशांत मन शांत शांत करावे....
एक वार्याची झुळूक व्हावे
दर्या खोर्यात मस्त हुंदडावे
पाना फुलांना स्पर्श करुनी
आनंदाने गगनी विहरत राहावे....
एक वार्याची झुळूक व्हावी
चांदोबाला स्पर्श करायला जावे
चांदण्याच्या रांगोळीत मनसोक्त
स्वर्गीय सुख हे अनुभवावे....
एक वार्याची झुळूक व्हावे
नीलवर्णी गगनी बेधुंदीत फिरावे
उंचावरून दिसणारे सृष्टीसौंदर्य
या मृगनयनी साठवून घ्यावे......
