STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

वारकरी

वारकरी

1 min
162

विठ्ठल नामाच्या रंगात अवघा रंगुन जाई वारकरी 

गजर करत पायी निघाला दर्शन घेण्यास पंढरपुरी  


मस्तकी मुकुट 

माथी चंदनाचा टिळा

 हातात तुळशीच्या माळा  

लागतो फक्त पांडुरंगा

 तुजला लळा 

वारकऱ्यांना बघतो 

कमरेवर हात ठेवून

 विटेवरी उभा तो विठू सावळा  


 वारीमध्ये वाजते टाळ मृदुंग 

वारकरी तो माझा गाई 

नामाचा अभंग 

नसे कशाची गरज 

ना भूक, ना तहान 

वादळ, वारा सहन

करत वारकरी, करे मनी विठ्ठलाचे ध्यान

भेगा पडल्या पायाला 

तरी विठू नाम घेण्यास तल्लीन हा भक्त होतो

 टाळ, मृदुंगाच्या गजरात विठ्ठलच

 त्या माऊलीला बळ देतो 


अवघा जनसागर दुमदुमतो माऊली या नावाने 

दुःख सारे वाहून जाते पांडुरंगाच्या एका दर्शनाने  


पंढरीची वारी दंग

 भजनात वारीचे वारकरी

 पंढरीची वारी पुण्य पडते पदरी 

सदा घडो सेवा आस असते ही अंतरी


Rate this content
Log in