STORYMIRROR

angad darade

Others

3  

angad darade

Others

वारकरी

वारकरी

1 min
184

वारकरी होय । माळकरी होय । 

पंढरीशी जाय । विठुभेटी ॥ 


भेट घे विठुची । तुझ्या मालकाची । 

माऊली भक्तांची । विठू हाय ॥ 


ओळख तयाशी । कर कटावरी । 

उभा विटे वरी । तोच देव ॥ 


काय सांगू कुणा । संतांचा महिमा । 

आला त्यांच्या कामा। देवची रे ॥ 


भक्तीची शिदोरी । देवाशी या दे रे । 

दर्शन तू घे रे । विठोबाचे ॥ 


माय बाप हाय । धर त्याचे पाय । 

नाहीतर जाय। व्यर्थ जन्म ॥ 


भज त्यासी अता । भक्तीस धावतो 

भक्तांना पावतो । विठू माझा ॥ 


अंगद हा म्हणे । पंढरपुरा जा रे । 

देवाशी पहा रे । याच जन्मी ॥ 


Rate this content
Log in