वारी
वारी
1 min
369
पंढरी च्या वारी ला चालले बाया बापडे
गळ्यात तूळशी माळ डोक्यावरती गांधी टोपी
माथ्यावर काळ्या बूकयाचा टिका चंदनाचा टिळा
बाया च्या डोकयावरी तूळशी वृदांवन
हातात टाळ चिपळया स्वर
"विठ्ठल-रुक्मिणी "चे ध्यान हरिनाम
बोला विठ्ठल-रुक्मिणी चे नाम बोला
ओठा मध्ये हे बोल ध्यान मन
झाले मन तलिन झाले मन
"विठ्ठला " च्या अधिन झाले.
पाय नाचू लागले, पंढरी च्या वारी मध्ये चालत राहिले
चालत राहिले पंढरपूर येता "चंद्रभागेत "न्हाऊन गेले
विठ्ठल-रुक्मिणी च्या मंदिरात ध्यान पावले,
मन प्रसन्न झाले.
ही अबाल वृद्धाची बाया बापडाची माया!
