वाईट स्वप्न
वाईट स्वप्न
अस्त होतो रवी क्षितिजावर
निरोप घेऊन जनजीवनाचा
पसरतो अंधार दाहीदिशा कीर्र
प्रहर येताच रातीचा
थकलेली काया विसावते
होते निद्रिस्त शरीर
बाहेरील मन होते शांत
अंतःकरनात चालतो जागर
मीच हवी तिला सदा
मिठीत घेऊन झोपायला
स्वस्थ पडल्या पडल्या
वेळ का लागतो गोष्ट सांगायला
अशाच एका राती
पहुड्लेलि मि शय्येत
मिट्लेलि लोचने
भिरभिरतात शांततेत
मजेत फिरतोय दोघी
आनंद घेत जत्रेचा
मन हरकलें तिचे
पाहून रास खेळण्याचा
हट्ट केला लेकीने
पाहिजेत खेळणे मला
गुंग जाहले मि बघण्यात
हात सुटला हातातला
शोधतोय चहूकडे
सापडे ना पोर माझी
नूर उडाला चेहऱ्याचा
लागला जीवाला घोर
धाय मोकलून रडले
आशेने शोधू लागले
उघडला अचानक डोळा
लेक आई आई ओरडू लागले
मुके घेतले पटापट
मायेने जवळ घेतले
धन्यवाद केले देवाला
वाईट स्वप्न म्हणून सोडून दिले
