वाद्यमेळा
वाद्यमेळा
सर्व वाद्यांची भरली सभा
बाजा मात्र गाल फुगवुन उभा
ओठांवर लागला इकडेतिकडे नाचू
वाद्यांना आले गाली हसू
बासरीने मग मारली सुंदर लकेर,
जशा कोकिळ पक्षी जलतरंगात पाणी भरले,
मनात आले काढावी पाण्यावर नक्षी
टिकटिक आवाज त्याचा आला कानात जादू आहे त्याच्या स्वरात
पेटीने काढला सूर, तबल्याचा तो ताल
सनईच्या सुराला मिळाला मंगल समयी मान
तिच्या सुराने लग्नघटिका येतो जवळ क्षण
मनाची घालमेल गोड असते पण
ताशा धडाडधूम वाजतो
वरातीत घोडा आनंदाने नाचतो
सुरांची ती बैठक रंगली वाद्यांमुळे गवसले सात सूर
गाणे गायला भरुन येतो ऊर
