STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

वाद्यांची मैफिल

वाद्यांची मैफिल

1 min
206

मैफिल वाद्यांची जमता

स्वरझंकार उमले

स्वरांतूनी शब्द उमलता

रसिक मनोमनी झुले   (1)


सिंथच्या स्वरांवरती

गाणी उडत्या चालीची

हात फिरता वेगानी

दाद मिळे ती टाळीची  (2)


व्हायोलिनचे आर्त स्वर

अंतःकरणाला भिडती

कंठस्वराच्या जवळिकीने

दुःख दर्द आळविती    (3)


दिड दा दिड दा स्वर बहारे

उत्साहाची कारंजी फुलती

नर्तन स्वरलहरींचे

रसिक मनास रिझविती   (4)


तालवाद्यांच्या झणकारांनी

मैफिलीत येई जान

सूर ताल लय नर्तनी

रसिक होई बेभान!! (5)


साहित्याला गुण द्या
लॉग इन