STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

वाढदिवसाला (सहाक्षरी)

वाढदिवसाला (सहाक्षरी)

1 min
114

दिवस आजचा

आनंद घरात

सजली रांगोळी

तोरण दारात


स्वयंपाक खास

तुझ्या आवडीचा

प्रत्येक तो घास

लागे अमृताचा


नवेच कपडे

बघ तुझ्यासाठी

चॉकलेट खाऊ

खास मित्रांसाठी


वाढदिवसाला

शुभेच्छा देतील

तुझ्यासाठी बघ

गंमत असेल


तुला आशिर्वाद

मोठयांचा मिळावा

महापुरूषांचा

आदर्श तू घ्यावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन