वाचन
वाचन
1 min
545
लागला छंद जीवाला
पुस्तक हवे वाचायला
नको खाऊ नको पैसे
वाचन पुरेसे हसायला ||१||
कथा वाचून कळते
कसे मी जगावे
कविता वाचून कळते
आनंदी कसे रहावे ||२||
घडावे सुंदर चरित्र
समजावते पुस्तक मला
संस्कारी समाजाचे लक्षण
पुस्तक सांगे अनुभवाला ||३||
रहस्य उलगडे हळूवार
शहाणे करील विज्ञान
धर्म आणि कर्म जाणावे
वाचनाने मिळेल ज्ञान ||४||
जडावा सर्वांशी हाच छंद
वाचता सापडावा परमानंद
वाचन हाच नवा मंत्र
आयुष्याला देईल सुगंध ||५||
