वाचन संस्कृती
वाचन संस्कृती


संस्कार आणि चांगले विचार
हे वाचनाने रुजविले जातात !
वाचनाच्या गोडीने अज्ञानाचे
अंधकार दूर केले जातात !!
माणसाच्या कल्पनाशक्तीचा
वाचनामूळे विकास केला जातो !
ललित साहित्याच्या वाचनामुळे
अनुभवाचा आनंद घेता येतो !!
अध्यात्मिक ग्रंथ वाचल्याने
मनाला उभारी येते!
अभंग आणि काव्याने
रसिकता गुण वाढीस लागते !!
सतत वाचना
ने व्यक्तीचा
सर्वांगीण विकास होतो
वाचाल तर वाचाल
असा संदेश देऊन जातो !!
ऐतिहासिक पुस्तके त्या
कालखंडातून फिरवून आणतात!
भूतकाळाची भ्रमंती केल्याचा
अनुभव देऊन जातात!!
वाचनाचा छंद आपली
ज्ञानाची भूक भागवितो
मनाला प्रसन्न ठेवून
मनोरंजनही करतो !!