ऊन ऊन उन्हाळा..
ऊन ऊन उन्हाळा..
तीन ॠतू माहित सगळ्यांना...
माझा विषय असे, आज उन्हाळा.
हा उन्हाळा अतिप्रिय बाल गोपाळा
कारण बंंद असे त्याची शाळा.
खेळायला मिळे वेळ मोकळा...
असा हवाहवासा वाटे मुलांना उन्हाळा.
स्त्रीवर्ग ही रमूूून जाती येता उन्हाळा..
वर्षभराच्या बनवती मसाले,पापड,कुरडळ्या,
सुकवती मिरच्या,आमसूले अन् आंबपोळ्या.
पुरुष मंडळींना ही आवडे उन्हाळा...
त्या काळात असे प्रमोशन चा लळा...
मिळणारा वार्षिक रजेचा आनंद, तो वेगळा..
अशी असते धमाल मस्ती मजा येता उन्हाळा..
मामाच्या गावचा तर थाटच आगळा.
बळीराजा ही होतो सज्ज कसुनी जमिनीला.
पक्षी ही तयार होतात घरटीबांधण्या.
वाढता वातावरणातील उष्मा...
वेध लागती सर्वा श्रावणसरीचा.
जाऊनी हा उन्हाळा,
येणारा ॠत असे पावसाळा...
