ऊन सावली
ऊन सावली

1 min

459
ऊन सावलीच्या खेळामध्ये
एकदा ऊन रूसून बसल
' साऱ्यांना बरी तूच आवडतेस
माझ कौतुकच नाही कसल
जो तो मला नको म्हणेे
मुरडूून नाक मिचकावूून डोळे
शुभ्र स्वच्छ अन लख्ख असे मी
तरीही मजला जो तो टाळेे
तुला मात्र भलताच भाव
तुला पाहून खुश सगळे
माझ्यापासून दूूूर होतात
तुझ्या मात्र गळ्यात गळे
' कसे कळले नाही तुला?
तू आहेस म्हणून मी आहे
मी नाहीच मी तुझ्या विना
कधी तु कधी मी
हाच तर तुुझा- माझ खेळ
एकच आपण दोघे बघ
जन्मांतरीचा आपला मेळ '
'खरच गं तु अगदी खरय
माझ्या लक्षात नाही आल
माझी साावलीच कि गं तू '