उत्तर...
उत्तर...
आयुष्यात प्रश्न उत्तराचे एक समीकरण असते ...
आयुष्य प्रश्नाभोवती फिरते ...
काही उत्तर सापडतात ....मात्र काही हरवतात ....
आयुष्यात असंख्य प्रश्नांनाना सामोरे जावे लागतात ....
असेच काही प्रश्न आपल्या आजूबाजूला असतात...
ज्याची उत्तर मात्र नाही सापडत ...
पाणी टंचाईने पडली असते कोणाच्या तरी घशाला कोरड .....
तर कुठे पाण्याची होते नासाडी वरचेवर ....
महिलांच्या सुरक्षेचा आहे गंभीर विषय ...
ह्यावर नाही बसला कठोर नियम.....
उचशिक्षित बेरोजगार जगतात ....
काही लोक लाखोची उलाढाल करून नोकरी कसे मिळवतात...
महागाईची राक्षसाचा वध कोण करेल ,,
गरीबाची भूक कशी भागेल ..
म्हातारपणात पाठवलं जात वृध्दाश्रमात ....
आधारासाठी मनात मात्र ते रडतात ...
असे अनेक प्रश्न आहे आजच्या काळापुढे ,....
त्याचे ठोस उत्तर नाही कोणाकडे ....
