STORYMIRROR

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

उत्सव देवीचा

उत्सव देवीचा

1 min
14.5K



नऊ दिवस उपास

पायी नसे रे वहाण

पोट जरी खपाटीला

नाही भूक नी तहान ।।


चाले उत्सव देवीचा

नऊ दिवस माळीचे

वस्त्र नेसून रंगीत

लाल साडी नी चोळीचे ।।


झाली वाघावर स्वार

हाती त्रिशूळ घेऊन

भक्ता रक्षण करण्या

आली अंबिका धावून ।।


अंबा बसली राऊळी

चाले जागर गोंधळं

दारी नाचती मुरळी

वाघ्या वाजवी संबळं ।।


अंबे सजलं मंदिर

भक्त चाले तुझी वाटं

लाल कपाळीच कुंकू

भाळी शोभे मळवटं ।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन