उत्साहाचे गान व्हावे
उत्साहाचे गान व्हावे
1 min
154
(गागागागा, गालगागा,गागागागा, गालगागा)
उत्साहाचे गान व्हावे, इतिहासाचे पान व्हावे
वाटावा अभिमान मोठा, या गावाची शान व्हावे
पाठीला डोळे नसावे, तेथे कुजबुज काय चालू
ऐकायाला बोल कुजके त्या भिंतीचे कान व्हावे
जलधारांनी ताल धरला, राने ओले चिंब होता
विरहाच्या अग्नीत जळता मी तान्हेले रान व्हावे
बाकी आहे सांज माझी, छोटेपणही छान गेले
तारुण्याची गोष्ट न्यारी, मस्तीने बेभान व्हावे
संसाराचा डाव माझ्या, अर्ध्यावर मोडून जाता
पोरांचा सांभाळ करण्या मी अंगाई गान व्हावे
मावळतीला सूर्य जेव्हा विश्रांती घ्याया निघाला
जग उजळाया देह जाळून मिणमिण पणती सान व्हावे
