!! उसने !!
!! उसने !!
1 min
291
दुःख मनी दाटले असताना ,
सुखाच्या सावलीसाठी ,
किती उसनी आणावी ,
हिरवळ जीवन जगण्यासाठी...!!१!!
अधीर झालेल्या मनाला ,
धीर मिळवून देण्यासाठी ,
किती उसन्या आणाव्या ,
भावना मनी आनंदासाठी...!!२!!
आयुष्याच्या खडतर प्रवासात ,
मार्ग शोधत चालण्यासाठी ,
किती उसने आणावे ,
वळण चांगले वळण्यासाठी...!!३!!
कसोटीच्या क्षणी जणू ,
फुंकर घालून बहरन्यासाठी ,
किती उसना आणावा ,
ओलावा जीवन जगण्यासाठी...!!४!!
