STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

3  

अमोल धों सुर्यवंशी

Others

उसना पैरा.....

उसना पैरा.....

1 min
237

काय हे जगण उपारटयाच......

लाचार आणि रूबाबाच....

कोणी नाही वाली..

नुस्ती षडं बयमाणी....

किती दारे ठोठावली

रिकाम्या झोळीनी....

पोटाची पाठ झाली...

भुकेला उथळ लाथच....


हे शरिर खरकाट तर..

आत्मा अमर. ...

कोंबडा कापुन...

साजरा करू जागर. .....


दारिद्र्याची स्पन ...

दारिद्र्य....

डोळयाने वाहवली...

कणखर...

कोरड्या डोळ्यांनी...

लाजच सोडली......


काय हे जगण.

उठाठेवीचं.....

कधी हीते. .

तर कधी तिथे....

सरंडा सारखे रंग बदलणारे ....


फाटक्या काळजाला घाव.

नाय बसला...

तिच्या. ....

पदराच्या आड ईवलुशा दिसला...

जगाव त्यासाठी ...

जगवेल तो अपल्याला......


पारंब्या फुटतील फुलाने ओंजळ

भरेल. ...

पंख तुटलेला पक्षी .

पुन्हा गगन भिडेल. ...


कसल हे उरपट. .....

जगण. ...

तेव्हा. .

आईच्या पदरा मागे लपणारा ....

आता..

बायकोच्या पदरा मागे दिसला ...

बोट देणार्‍या हाताने

साहारा काटीचा घेतला....


साहेब पुस्तक घ्यायची...

लेकराला. .

थोडे उसणे पैसे....

मिळतील का?

मला.......


श...शब्द भिगुंर ......


Rate this content
Log in