उरलं नाही नात्यात
उरलं नाही नात्यात
1 min
350
उरलं नाही नात्यात
अडकून पडावं असं काही,
गळून पडले बंध नाळेसारखे
तरी आस सुटत नाही
सुटता सुटत नाही भाळावरचे बंध ...
पावलांना आधार जमिनीचा
जमिनीवरून जाणारी वाट तरंगण्याचा
आभास का निर्माण करतेय अविरत...
मुठीतून नीसटणार्या वाळूला घट्ट पकडून ठेवण्यासाठीची धडपड
का होतेय वेगवान?
