उपकार
उपकार
1 min
256
बोचतील आरोपांचे
वार कसे?
समजावून मनाला केले
मी तयार असे!
आठवणी तुझ्या जगण्याला
साधन हे मला
क्षणांना सोबतीच्या केले
मी आधार असे!
घडावे काय?
उपरी याच्या तरी
सोबतीने तुझ्या दिले
तू आकार असे!
मागणे काय ते थोडेसे
माझे होते
मोकळे केले सुखाचे
तू दार असे!
गुंफित होतो स्वप्नांची
या माळ मनी
जीवनी हात देतं तू
केले साकार असे!
दुरावा तुझा कबुल
या माझ्या मनाला
मजबुरीला तुझ्या केले
मी स्विकार असे!
काय रूसवे करु आता
त्या क्षणांचे
विसरू कसे तरी
ते उपकार असे!
