उपाय
उपाय
चंद्रावाणी साजर रूप, चांदण्या त्या जळत्या झाल्या.
आरोपात बुडउनी तुजला, जाताना त्या मळल्या गेल्या.
नजरला लागली नजर, भुरळ ती माझी मला.
जमतया भोळेपण, माज बाकी तूझा तुला.
कमाल ती झाली अशी, कवतिक साऱ्या जगा.
जस तुला काही ठाव न्हाई, माझ मलाच बघा.
बघतोया आवडीनं, काढलीया सवड केवडी.
भीती समोर आडवी ऊभा, गोळा पोटातला थांबवे तेवडी.
पापणीही पडनया, अवचित असतो ऊभा.
तूझ्या ऐकलीचा इचार, भरवतो मनाच्याच सभा.
शाहिरी बाज माझा, मढ्विण शब्दामंदी.
तुझं काही लक्ष नाही, बघत जा कधीमधी.
साऱ्या गावात झालं, तरी तु समजत न्हाई.
कोरा कागद रखडण्यापरी, दुसरा काय उपाय ठाई.
