उन्हाळ्याची सुट्टी..
उन्हाळ्याची सुट्टी..
उन्हाळ्याची सुट्टी होती
बघा हक्काची आपली
आपली कुणी धाव घेेई आजोळी तर
कधी कुणी मामाच्या गावी
कोरोनाचा कहर झाला
जगभर उच्छाद मांडला
सुट्टी ऊन्हाळ्याची लुप्त झाली
मुलं सारी घरात बंंद झाली
सुट्टी्ची ती मजा संंपली
गावे गल्ली बगीचे सारी ओस पडली
नाही उरली उन्हाळ्याची मजा
कोरोनाने दिली सर्वांना सजा
मामाकडची आमरस पुरी
आठवू लागली ती बैलगाडी
लाल तांबडी मातीमधला खेेळ
साऱ्यांनी मिळून केलली ती भेळ
चोर शिपाई
लपाछपीची ती नवलाई
आजीच्या कुशीत पडुनी
रोज रात्री अंंगणात झोपुनी
मोजावी ती रात चांदणी
घरभर भावंडांची वर्दळ
आठवते ती सारी गंमत
कोरोनाने जावं लवकर
परत यावी ती सुट्टी
ऊन्हाळ्याची हक्काची
