STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

2  

akshata alias shubhada Tirodkar

Others

उन्हाळा...

उन्हाळा...

1 min
3.2K

तो येतो उष्ण ताप घेऊन

कडक उन्हं पांघरूण

आवश्यकता असते तेव्हा थंड वाऱ्याच्या झुळूकेची...

थंड पेयाची पदार्थांची आणि एसी फॅन कुलरच्या वाऱ्याची...

गरम मसालेदार पदार्थांना असते थोडे दिवस बुट्टी...

लिंबू सरबताशी जुळते सगळ्यांची गट्टी...


उन्हाने वाळत घातलेले पापड कुरडया मस्त कुरकुरीत होतात...

वर्षभरासाठी मग ते डब्यात भरतात...

गर्मी पळविण्यासाठी समुद्राचीही सैर होते...

छत्री पण सावलीसाठी उघडली जाते...

असा हा उन्हाळा थोडा खट्टा थोडा मिठ्ठा असतो...

पावसाच्या आगमनाने नाहीसा होतो...


Rate this content
Log in