STORYMIRROR

Stifan Khawdiya

Others

3  

Stifan Khawdiya

Others

उन्हाळा - विडंबन

उन्हाळा - विडंबन

1 min
11.5K

प्रथम जेष्ठ कवयित्री शांताताई शेळके यांची माफी मागुन त्यांची कविता पाऊस ह्या कवितेवर माझी विडंबन कविता उन्हाळा..


उन्हाळा


उष्णतेचा वाढे पारा सरासरा

तापली भुई,वाढला 

उन्हाळा भराभरा

लागतात झळा सर्वत्र जळजळीत

पदोपदी देहाला चटका बसे

उन्हात

आकाशत रवी झाला तेजाळ

प्रखर किरणे आला गरमीचा

काळ

लागे झळा होई देहाची लाही लाही

घरातून निघेना जरी हवं असलं 

काही

दु:ख वाटे सुकली हिरवळ

पर्ण रहीत झाडे पाण्याची

झळ

कुरनाला तडाखा उन्हाचा बसला 

चा-याचा प्रश्न, गुराख्यांना 

पडला

आटली सरीता डोहात साचली

ओटीत तिच्या दगड गोटे

दिसली

वृक्षांची पान उन्हानं करपली

करपलेल्या पानांना गळती

लागली

मावळला रवी आंधारली धरती

काळोखात शितलता झाली

भुईवरती

आंधारात काजवे चमकु लागले

वाळलेले झाड कसे अचानक 

खुलले

उन्हानं धरती भेगाळली

वरुणाच्या प्रतिक्षेत तहानली


Rate this content
Log in