STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

उंच माझा झोका

उंच माझा झोका

1 min
597

कर्तृत्वाने सदा पुढे

कार्यभार सांभाळते

नित्य नवीन क्षेत्रात

नवी उर्मी उसळते    (१)


भेदभाव नाही कधी

नाही कुणी सान थोर

समानता सर्वांभूती

मदतीचा हातभार     (२)


प्रगतीने सकलांनी

पुढे पुढेच चालावे

सदा पवित्र उद्दिष्टे 

कार्य करीत रहावे     (३)


केल्या कार्याची पावती

नको मजला कशाची

चित्रगुप्त लिहीतसे

नोंद ती भल्या बु-याची  (४)


सत्कार्याचे फळ मिळे

नसे लाडका दोडका

समजले जगताला

आज उंच माझा झोका  (५)


साहित्याला गुण द्या
लॉग इन