उंबरा
उंबरा
1 min
215
संस्काराच्या शिदोरीत जसे,
शालीनतेला मान आहे,
घराच्या चौकटीत जसे,
उंबऱ्यावर स्थान आहे.
माणुसकी सदैव जपताना,
मी पणाला जागा नाही,
तसेच घर कितीही मोठी असो,
उ़बऱ्याशिवाय शोभा नाही
गृहप्रवेशाची
सुरुवात त्यांचीच,
पूजा करून होते ना,
मांगल्याचे दर्शन तुम्हाला,
याच उंबऱ्यावर घडते ना.
