उमेद जगण्याची...
उमेद जगण्याची...
..पती वारल्यावर मुलांसाठि म्हणुन
काहि चार पैसे कमावावे म्हणुन
रस्त्याच्या कडेला साबुदाणावडा
विकणारी एक बाई मला दिसली होती...
" भाऊ कवा तरी आमच्याहातचो खाऊन
पाहा ,कसो लागतो तो " म्हणत माझ्याकडे पाहुन
किंचीतशी हसली होती..
....वाटलं तिच्यावर पण काहितरी लिहावं
कधी आपल्याला तिच्या जागी ठेवुन पाहावं...
...ती त्याच्या निधनाच्या धक्क्यातुन सावरली होती
त्याच्या अकाळी जाण्याने तिची आशेची
ज्योत काहि दिवस मावळली ह़ोती...
...पण ती परिस्थितीपुढे नव्हती वाकली
पुन्हा नव्या ऊमेदिने जगु लागली नशीबावर
पण तिने चादर झाकली...
कळलं होतं तिला जग किती खरं
नी किती होती नकली...
...तिच्यात आत्मनिर्भरता आली होती
आता ती लेकरांची माय
नी बाप झाली होती...
तिने जिवन जगणे शिकले होते
स्वत:च्या विश्वासाच्या बळावर
तिचे अस्तित्व टिकले होती...
