STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Others

3  

Dilip Yashwant Jane

Others

उजाड

उजाड

1 min
256

डोंगर माथा उजाड सारा

नाही कोठे शीतल छाया

भयाण भकास सारे वाटे

कोठे विरली निसर्ग माया


पशु पक्षी सारेच हवालदिल

नाही राहिला कोठे निवारा

कसे आटले सारेच पाणवठे

कोठे शोधावा निवांत किनारा


साज हिरवळीचा सारा हरपला

उष्ण उनाड वाहतो वारा

दोष द्यावा कुणा मानवा

कशी वाचेल सांग धरा


भविष्य आहे कठिण दोस्ता

घ्यावा ध्यास आपण आता

समतोल सांभाळू सारा निसर्गाचा

तरच वाचेल भूमी माता


तुझ्या माझ्या मनात दाटलेला

देऊ सोडून हव्यास सारा

ओरबाडून घेण्याची टाकून लत

जाऊ निसर्गाच्या जवळ जरा


Rate this content
Log in