उघड दार देवा
उघड दार देवा
1 min
17
साथ माझी सोडू नको
अंतर कधी देऊ नको
राहू दे सतत तुझ्या चरणाशी
नितांत सेवा करील दिनरात्री
तुझ्यावर प्रचंड निष्ठा
असे या भक्ताची
लाज राख परमेश्वरा
माझ्या स्वाभिमानाची
घेशील किती परीक्षा
तुझ्या या बालकाची
तार अथवा मार तू
सर्वस्वी सोपवले तुझ्या हाती
रडतो हा आत्मा समर्था
ना सोसवे त्रास आता
प्रपंच सोडून येते
उघड दार देवा आता