उधाण
उधाण
1 min
323
काळ्याकुट्ट ढगातून
पडे पावसाचे दान
सरिवर सरीओल्या
ओलेचिंब झाले रान
शेत हिरवे हिरवे
रानमेवा उगवला
बीज पेरून मातीत
बळीराजा सुखावला
गंध मातिलाही आला
उजळल्या दाही दिशा
स्वप्न काळजात माझे
झाली वेडीपीसी निशा
नभी चांदण्याची रांग
आले उधाण वार्याला
वेडा चंद्र पौर्णिमेचा
खुनवतो सागराला
नभी फुले इंद्रधनू
जीवनाचे सात रंग
धरणीच्या कुशीमध्ये
भासे कस्तुरीचा अंग
