STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

उद्देश फुलांचा

उद्देश फुलांचा

1 min
205

सृष्टीस सुशोभित करतात सुगंधित फुले ही उमलणारी 

चराचर गंधाळून देती अन् बनतात सुख दुःखाचे वाटेकरी


प्रसन्नतेचे लाभलेले वरदान 

खुलवी वदनावर हास्य

 आणले कोठून रंग अगणित ना सुटते कोड्याचे हे रहस्य

 

मैत्रीलाही आधार देतात

प्रतिक बनून प्रेमाची साक्ष देतात

स्वागत करण्यास सदैव पुढे असतात देवाच्या चरणी नतमस्तक होतात

फुले हीच शेवटी 

देहाला आलिंगन देतात

 जणू नाती जपणं हा उद्देश त्यांचा

 विविध रंगाची उधळण करित झाडांवर कसे फुलतात 

जसे आपल्याला पाहून अंतरंगात डुलतात

 ह्रदय कस त्यांना बघून मोहून जातं 

त्यांच्या सुगंधात आपलं दुःख विसरून जात


उद्देशच फुलांचा

 मनास प्रेरणा देण्याचा

 त्यांचं जगण आपल्यासाठी त्यांच वागण

आपल्यासाठी स्वतःसाठी जगण का जगण आहे

दुसऱ्यांचे जगणे सुंदर करणे हेच त्यांच ईश्वराला मागण आहे


आयुष्य मोहक करून सुगंध देऊन जातात

 खुलत राहावे, हसत राहावे सदा 

ही शिकवण देऊन जातात 

वाटते कदाचित हाच उद्देश असेल 

फुलांच्या जगण्याचा म्हणूनच

कधी कधी हेवा वाटतो त्यांच्या निरागस वागण्याचा ... 


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ