त्यांच्यासाठी एक गुलाब🌹
त्यांच्यासाठी एक गुलाब🌹
1 min
171
तळहाताचा करून पाळणा
ठेविले मज मायेच्या पंखात
वाढले आईवडिलांच्या छायेने
ठेवले नेहमी मला फुलात
त्यांच्यासाठी एक गुलाब---१
तळहाताच्या फोडाला केले जतन
पाठवले सासरी आनंदात
काळजावर दगड ,अश्रू नयनात
सुने सुने वाटे आठवण येई घरात
त्यांच्यासाठी एक गुलाब--2
खंबीरपणे संकटात आमच्या
अजूनही पाठीशी उभी असतात
हिंमत देत सगळ्यांना डोक्यावर
आमच्या आशीर्वादाचा हात
त्यांच्यासाठी एक गुलाब
त्यांच्यासाठी एक गुलाब
