त्या वळणावर खुप पाऊस होता...
त्या वळणावर खुप पाऊस होता...
इवल्यांशा मनात निरागस नात,
कागदांची नाव घेऊन हाती
पावसाला बोलावित,
खट्याळपणाचे दिवस मागे
सोडले बालपणाला जीथे,
त्या वळणावर खुप पाऊस होता...
किशोरवयीन अल्लड अवखळ,
समजे ना उमजे तरीही मोठ
आपलीच दुनिया मस्त,
या वयात घ्या खबरदारी
सूचनेचे फलक वाटे स्वस्त,
सोडले बेधुंदपणाला जीथे
त्या वळणावर खूप पाऊस होता...
तरुण ध्येयवेडेपणा,
काहीतरी करूण दाखवण्याची जिदद्
राहू देईना शांत तोडून हदद्,
लक्ष एकच कष्ट करा दिवसरात्र
नाव करा स्वर्णाकींत हीच वेळ अंकीत,
सोडली प्रयत्नांची पराकाष्ठा जीथे
त्या वळणावर खूप पाऊस होता...
प्रेमाची खट्याळ नांदी,
दिलाची सुरु अदला बदली
तुम बिन जीया जाये कैसे म्हटली,
पाहून ऐकमेंका काळीज धडधडली
कधी पूर्णत्वाचा वसा ,
कधी अधूरेपणाचा ठसा
सोडली प्रेमाची नाव गटांगड्यां खाण्यासाठी जीथे,
त्या वळणावर खूप पाऊस होता...
पडली रेशीमगाठ ,
जूळल्या जन्माच्या साथी
सप्तपदी म्हणत भटजी,
मंत्रोउच्चार कानी पडत होते
पाहून वर वधू लाजत,
स्पर्श शहारत होते
ओलांडली ती वेळ जीवनाची जीथे,
त्या वळणावर खूप पाऊस होता...
संसारवेल बहरली,
एकाचे दोन दोनाचे चार झाली
हसण्या खिदळण्यात,
बालपणे रमली
पून्हा नव्याने जन्म देऊन मी जन्मली,
झाली पूर्णत्वाची खात्री जीथे
त्या वळणावर खूप पाऊस होता...
वृध्दोपकडा दाट,
एकमेंकाची साथ
एकमेकांचा आधार,
आठवुन साऱ्यां कहाण्या
जगलो जीवन ऐसे म्हणण्या,
सुरकूती ओठांची हसे जिथे
त्या वळणावर खूप पाऊस होता...
