STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

4  

akshata alias shubhada Tirodkar

Others

त्या दिवसाचा मेसेज .....

त्या दिवसाचा मेसेज .....

1 min
263

कॉलेज संपले डिग्री हातात पडली ....

आता वाट धरली करिअरची ...

सुदैवाने सहा महिन्यातच नवी नोकरी मिळाली ....

आणि मी नोकरीत रुजू झाली ...

कामात रमून गेला माझा जीव ...

पाहत पहाता एक महिना झाला कामाला लागून ...

महिन्याची सात तारीख हि सगळ्या कामगारांसाठी असते पर्वणी ...

त्या कामगारांत माझी हि नेमूणक झाली ...

आला तो सात तारखेचा दिवस ...

खूप उत्सुकता होती माझ्या मनात ...

आज कष्टाचे पहिले फळ होते मिळणार

तेवढ्यात मोबाईलवर मेसेज झळकला ....

तुमच्या खात्यात अमुक रक्कम झाली आहे जमा ...

महिन्याच्या पगाराची होती ती रककम जमा ..

मेसेज वाचून मन भरून आलं ...

अभिमानाने मन सांगू लागलं

तुझ्या कष्टाचा पहिला पगार आला आहे तुझ्या हाती ...

अशीच प्रगती कर तू पुढे ही तरी ...

गेले ते दिवस वर्षामागून ...

पण तो दिवस आणि त्या मेसेजला मी कधीही विसरू शकणार नाही ...


Rate this content
Log in